पणज शासकीय आश्रम शाळा येथे जनजागृती कार्यक्रम



            अकोला दि. 13(जिमाका)- वन स्टॉप केअर सेंटर व जिल्हा बालसंरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, पणज ता.अकोट जि.अकोला येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पॉक्सो कायदा, चाईल्ड लाईन 1098,बालकांचे हक्क अधिकार व कायदे या बाबत बालकल्याण समितीचे सदस्य प्राजंली जयस्वाल यांनी खेळीमेळींच्या वातावरणात सोप्या पद्धतीने सोशल मिडीयाचे होणारे दुष्परीणाम, बालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर यांनी बालकांसाठी जिल्ह्यातील कार्यरत यंत्रणा , बाल विवाह, चाईल्ड लाईन 1098 याबाबत मार्गदर्शन केले. सखी वन स्टॉप सेंटरच्या ॲड. मनीषा भारे यांनी महिलांसाठी कार्यरत सखी वन स्टॉप सेंटरची कार्यप्रणाली तसेच पोक्सो कायद्याबाबत माहिती दिली.

जनजागृती कार्यक्रम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा परीवीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, प्र.मुख्याध्यापक के. जी.भगत, पी. एस. तायडे, डि. ओ. गडलींगे, अधिक्षिका एम. डि. वक्ते व शाळेमधील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.जी भगत, यांनी केले.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ