रस्ते सुरक्षा समिती; अवैध पार्किंग, अतिक्रमणांचे अडथळे तातडीने दूर करा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश




अकोला,दि.3(जिमाका)- शहरातील प्रमुख रहदारी मार्गांवर अनेक ठिकाणी खाजगी बसेस तसेच अन्य वाहने पार्क केलेली आढळतात. तसेच, गर्दीच्या मार्गांवर असलेल्या अतिक्रमन, अडथळे दूर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा रस्ता सुरक्षा समिती’ ची बैठक पार पडली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे एन.एल. येवतकर, महानगरपालिकाचे अजय शर्मा, प्रादेशिक परिवहन विभागाचे पोलिस निरिक्षक विलास पाटील, सार्वजनिक बांधकाम, मनपा अकोला यांचे अधिकारी उपस्थित होते.

अकोला शहरात मुख्य बसस्थानकाजवळ खाजगी बसेसचे अवैध पार्कींग होत असते, ते तात्काळ हटविण्यात यावे. अकोला मनपा हद्दीतील ठिकाणे निश्चित करुन त्याठिकाणांना पार्कींग करण्यासाठी सोय करावी. या जागांची पाहणी मनपा व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे करावी. गर्दीच्या मार्गांवर बाजारपेठेत असणारी व्यावसायिक अतिक्रमणे हटवावी. तसेच वारंवार होणारे अतिक्रमणावर कडक कार्यवाही करावी,असे निर्देश देण्यात आले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ