सेवा प्रणालींमधील सुधारणा सुचनांचा प्रस्ताव पाठवा -अमरावती विभागीय सेवा हक्क आयुक्तांचे निर्देश

  अकोला दि.१९(जिमाका)- नागरिकांना शासनाच्या विविध सेवा सुविधांचा लाभ देतांना त्या ऑनलाईन व अधिकाधिक पारदर्शक पद्धतीने दिल्या जाव्यात तसेच सध्या देत असलेल्या सेवा प्रणालींमध्ये करावयाच्या सुधारणा सुचनांचा



 प्रस्तावही पाठवावा असे निर्देश  महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे  अमरावती विभागाचे आयुक्त  रामबाबू यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे  अमरावती विभागाचे आयुक्त  रामबाबू  यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण,  उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, कार्यकारी अभियंता हरिभाऊ गिते, तसेच सर्व तहसिलदार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला. या प्रणालींद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध दाखले, प्रमाणपत्रे आदींच्या विविध ठिकाणच्या उपयुक्ततेबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार, त्यात सुधारणांसाठी सुचनाही करण्यात आल्या. जिल्ह्यात अधिकाधिक ऑनलाईन सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. विशेषतः थेट लाभ देण्याच्या सेवा ह्या अधिक पारदर्शक व गतिमान कराव्या,असे निर्देश त्यांनी दिले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ