जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन





अकोला दि. 12(जिमाका)- जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद  यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमात  उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार व बाबासाहेब गाडवे यांनी जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सुरेश असोले, माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. चिमणकर, डॉ. मनिष शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार शिल्पा बोबडे तसेच  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*