सांस्कृतिक भवन क्रीडा संकुल येथे शनिवारी सामुहिक सूर्यनमस्कार



अकोला,दि.25 (जिमाका)-  क्रीडा  युवक  सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे  अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालया अकोला, सर्व योगा संघटना, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 28 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता सांस्कृतिक भवन क्रीडा संकुल, रामदास पेठ, अकोला येथे जागतिक  सुर्यनमस्कार  दिनानिमित्त,  सामुहिक सूर्य नमस्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.                

या कार्यक्रमामध्ये, एन.सी. सी. कॅडेट, स्काऊट  गाईड, शासकीय पोलीस प्रशिक्षण केंद्राचे  प्रशिक्षणार्थी सांस्कृतिक  योग केंद्र, योग भारती, स्वयंसिद्धा,विविध  एकविध खेळ संघटनेचे प्रतिनिधी, सर्व व्यवस्थापनाचे शालेय   महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, विविध शासकीय / खाजगी विभागाचे अधिकारी , कर्मचारी , विविध  एकविध खेळ संघटनेद्वारा राबविण्यात येत  असलेल्या क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी, विविध क्रीडामंडळे, निरंकारी मंडळ, नागरिक तसेच क्रीडाप्रेमी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ