ग्राहक हक्क संरक्षणासाठी सजगता महत्वाची : जिल्हाधिकारी वर्षा मीना जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा


 

 

 

ग्राहक हक्क संरक्षणासाठी सजगता महत्वाची : जिल्हाधिकारी वर्षा मीना

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा

 

 

अकोला, दि. २३ : ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येकाला ग्राहक म्हणून सुरक्षेचा,माहितीचा,म्हणणे मांडण्याचा,निवड करण्याचा अधिकार आहे. ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठी सजगता महत्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे केले.

जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम काटेपूर्णा सभागृहात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना निमजे यांच्यासह ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ग्राहकांचे हक्क राखून व्यवहारातील विश्वासार्हता टिकवणे, वृद्धिंगत करणे ही सशक्त समाजाची ओळख असते. ग्राहकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न व्हावेत, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्री. कुलकर्णी म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध ग्राहक सेवा एका क्लिकवर आल्या असून ग्राहकांना कालबद्ध सेवा पुरवणे ही प्रत्येक विभागाची जबाबदारी आहे. ग्राहक जागरूकतेविषयी एक लघुनाट्यही यावेळी सादर करण्यात आले. यावेळी ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी, विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*