श्रीरामनवमीनिमित्त विशाल शोभायात्रा; पालकमंत्र्यांचा सहभाग पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते श्रीराम मंदिरात पूजन





























श्रीरामनवमीनिमित्त विशाल शोभायात्रा; पालकमंत्र्यांचा सहभाग

पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या

हस्ते श्रीराम मंदिरात पूजन

अकोला, दि. २६ : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज श्रीरामनवमीत शोभायात्रेत सहभागी होऊन येथील मोठे श्रीराम मंदिर येथे प्रभू श्रीरामचंद्रांचे पूजन केले व दर्शन घेतले.

अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिर परिसरातून शोभायात्रेला सुरूवात झाली. आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, महापौर शारदा खेडकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शोभायात्रेत विविध संघटनांतर्फे देखावे, ढोलताशा पथके, भजनी मंडळ यांच्यासह हजारो भाविक सहभागी झाले होते.

पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन मोठे राम मंदिरात दर्शन घेतले व पूजन केले. ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने आसमंत निनादून गेले होते. विविध मंडळांतर्फे ठिकठिकाणी स्वागत, भाविकांसाठी पेयजल आदी व्यवस्था करण्यात आली होती. विविध संघटनांतर्फे वाहनांवर रामायणातील प्रसंगांवर देखावे प्रदर्शित केले. सिटी कोतवाली चौकातील श्री नृसिंहावतार देखावा लक्षवेधी ठरला.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*