ट्रॅक्टर, पॉवर टिलरची नोंदणी करून घेण्याचे आवाहन

 

ट्रॅक्टर, पॉवर टिलरची नोंदणी करून घेण्याचे आवाहन

                    अकोला, दि. १७ :  ट्रॅक्टर इंजिनबाबत लागू असलेले प्रदूषण मानक (ट्रॅक्टर इमिशन नॉर्म) स्टेज थ्री असलेल्या कृषी वापराचे ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कंबाईन  हार्वेस्टरची नवीन नोंदणी करण्याची दि. ३१ मार्चला संपुष्टात येत आहे. त्यामुळे संबंधितांनी नवीन नोंदणी मुदतीत करून घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले आहे.

ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कंबाईन हार्वेस्टर या शेतकी  वाहनांची नवीन नोंदणी दि. ३१ मार्चनंतर  राज्यातील कोणत्याही  प्रादेशिक परिवहन कार्यालयात करता येणार नाही. तरी जिल्ह्यातील  वाहन वितरक तसेच वाहन खरेदीदारांनी  या संवर्गातील वायु प्रदूषण मानक असलेल्या वाहनांची नोंदणी वेळेत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन