‘अमृत' तर्फे प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना

 

 

‘अमृत' तर्फे प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना

अकोला, दि. 2 : सी-डॅक या नामांकित प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या 'अमृत' लक्षित गटातील उमेदवारांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती देण्याची योजना राबविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी 'अमृत' च्या अधिकृत संकेतस्थळावर ३१ मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फ राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. जानेवारी व फेब्रुवारी २०२६ च्या बॅचमध्ये सी-डॅकमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. प्रत्येक प्रशिक्षणासाठी कमाल २० लाभार्थ्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

अमृत लक्षित गटात ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराती, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा आणि कानबी या जातीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*