बीज परीक्षण प्रयोगशाळेतर्फे कालबाह्य बियाण्याचा लिलाव
बीज परीक्षण प्रयोगशाळेतर्फे
कालबाह्य बियाण्याचा लिलाव
अकोला, दि. १६ : येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेतर्फे तपासणीअंती कालबाह्य
झालेल्या ३० क्विंटल सोयाबीन बियाण्याचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे.
पशुखाद्य उत्पादक संस्था तथा पशुपालकांनी लिलावात सहभागी होण्याचे आवाहन
करण्यात आले आहे. लिलाव दि. २४ मार्च रोजी दु. १२ वा. बीज परीक्षण प्रयोगशाळा परिसर,
नीळकंठ सूतगिरणीसमोर, शिवणी, अकोला येथे होईल.
लिलावापूर्वी प्रयोगशाळेत बियाण्याची प्रतवारी कार्यालयीन वेळेत पाहता येईल.
लिलावाच्या अटी व शर्ती प्रयोगशाळेच्या सूचनाफलकावर
पहावयास मिळतील.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा