सर्व्हायकल कॅन्सर टाळण्यासाठी लसीकरण सुरक्षित एचपीव्ही लसीकरणाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

 


सर्व्हायकल कॅन्सर टाळण्यासाठी लसीकरण सुरक्षित

एचपीव्ही लसीकरणाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

 

  

अकोला, दि. १३ : एचपीव्ही लस सर्व्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे, या लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम नसून, लस अत्यंत सुरक्षित आहे. लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी व्यापक जनजागृती करून लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.

एचपीव्ही लसीकरणाच्या अनुषंगाने बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत त्यांच्या दालनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, डॉ. मेश्राम, महिला व बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे आदी उपस्थित होते.

एचपीव्ही लस ही चौदा वर्षे वय पूर्ण झालेल्या व पंधरा वर्षांआतील मुलींना दिली जाणार आहे. जिल्ह्यात ९ हजार २९ विद्यार्थीनी पात्र आहेत. आरोग्य संस्थांच्या माध्यमातून लसीकरण होणार आहे. सर्व्हायकल कॅन्सर व भविष्यातील धोके टाळण्याच्या दृष्टीने लस सुरक्षित व उपयुक्त आहे. या लसीमुळे कुठलाही धोका दुष्परिणाम उद्भवत नाही. भविष्यात कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. याविषयी नागरिकांच्या मनात गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन