बार्टीतर्फे अकोल्यात ग्राफिक्स डिझायनिंगचे प्रशिक्षण

 

बार्टीतर्फे अकोल्यात ग्राफिक्स डिझायनिंगचे प्रशिक्षण

अनुसूचित जाती  प्रवर्गातील युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन

अकोला, दि. 4 : बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी फोटोशॉप व ग्राफिक्स डिझाईनिंग या विषयांवरील दोन महिन्यांचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

शास्त्रीनगरातील डाटामेट संगणक केंद्र येथे दि. ७ मार्च ते ११ मे दरम्यान हे प्रशिक्षण होईल. इच्छूकांनी दि. ५ मार्च रोजी दु. २ पूर्वी श्री. शिरसाठ, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र, शुक्ल सदन, दुर्गा चौक, अकोला येथे हजर राहावे. वय १८ ते ४५, जात प्रमाणपत्र, आधारपत्र, पॅनकार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्र, छायाचित्र आदी कागदपत्रे सोबत आणावीत. दि. ६ मार्चला दु. १२ वा. मुलाखती होतील. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी, विजय बेदरकर यांच्याशी संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*