‘नाबार्ड’तर्फे महिलादिनानिमित्त बार्शीटाकळीत आर्थिक साक्षरता मार्गदर्शन






 

 ‘नाबार्ड’तर्फे महिलादिनानिमित्त बार्शीटाकळीत आर्थिक साक्षरता मार्गदर्शन

अकोला, दि. १० : ‘नाबार्ड’तर्फे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सहकार्याने जागतिक महिलादिनानिमित्त बार्शीटाकळी येथे आर्थिक साक्षरता, आरोग्य, शिक्षण व सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शनपर शिबिर घेण्यात आले. 

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा, ग्रामीण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक सूर्यकांत जाधव, नाबार्डचे जिल्हाव्यवस्थापक श्रीराम वाघमारे, बँकेच्या शाखा व्यवस्थापक प्रिया खंडारे, सहाय्यक व्यवस्थापक मीनल रामटेके, डॉ. उज्मा अली, डॉ. नसरीन अली, डॉ. सुलभा ढक, उमेद अभियानाच्या अश्विनी नवघरे आदी उपस्थित होते.

योग्य आर्थिक नियोजन केल्यास महिला अधिक सक्षम आणि स्वावलंबी होऊ शकतात. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बँक खात्यावर व्यवहार दिसणे आवश्यक आहे जेणेकरून बँकेला कर्ज देण्यासाठी सुलभ होते. उत्पन्नवाढीसाठी व बचतीबाबत दशसूत्रीची माहिती श्री. वाघमारे यांनी दिली.  

महिलांना बँकेमार्फत उपलब्ध विविध कर्ज योजना व सेवा याबाबत श्री. जाधव यांनी माहिती दिली. सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती करून घेऊन त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. विमा, निवृत्तीवेतन व इतर सुरक्षा योजनांमुळे भविष्यातील आर्थिक सुरक्षितता मजबूत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. श्री. सिन्हा यांनी शिक्षण, आर्थिक स्वावलंबन व नेतृत्व या गुणांचा विकास होणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. ढक यांनी आरोग्य व पोषणाचे महत्त्व पटवून दिले. श्रीमती खंडारे यांनी आभार मानले.  

०००

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन