जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरणाला प्रतिसाद वाढता आरोग्य विभागातर्फे जनजागृती मोहिम

 

 

जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरणाला प्रतिसाद वाढता

आरोग्य विभागातर्फे जनजागृती मोहिम

अकोला, दि. 26 : राज्यभर  सुरू असलेल्या एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेला अकोला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी 14 वर्षे पूर्ण झालेल्या आणि 15 वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना ही लस देण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे पावणेसहाशे मुलींना लसीकरण करण्यात आले आहे. लसीबाबत नागरिकांत काही गैरसमज असल्यास ते दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बैठकीत दिले होते. त्याबाबत प्रशासन, आरोग्य विभागातर्फे जनजागृती होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिम गतिमान झाली आहे. 

आरोग्य विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मुलींना लस देऊन इतर पालकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे मोहिमेवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

 

ही लस प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय येथे मोफत उपलब्ध आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे लसीकरण केले जाते. 0.5 मिली मात्रा डाव्या दंडावर स्नायूमध्ये दिली जाते.

 

पालकांनी आपल्या मुलींना वेळेत एचपीव्ही लस देऊन त्यांना भविष्यातील गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

सर्व्हायकल कॅन्सर व भविष्यातील धोके टाळण्याच्या दृष्टीने लस सुरक्षित व उपयुक्त आहे. या लसीमुळे कुठलाही धोका दुष्परिणाम उद्भवत नाही. भविष्यात कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

०००

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*