सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ प्रथम

 

१५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात महाराष्ट्र जलसंधारण

 महामंडळ प्रथम

 

मुंबईदि. २९ मार्च : राज्य शासनाच्या १५० दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम अंतर्गत विविध शासकीय संस्थामहामंडळेप्राधिकरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या विशेष मोहिमेत राज्यातील इतर महामंडळांप्रमाणे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळानेही राज्यातील महामंडळांच्या वर्गवारीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला.

 

सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलारमुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल व्यवस्थापकीय संचालक विजय मगन देवराज आणि त्यांच्या संपूर्ण चमूचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात आकृतिबंधसेवाप्रवेश नियमज्येष्ठता सूचीपदोन्नतीसरळसेवा भरतीबिंदुनामावलीअनुकंपा भरती, IGOT प्रशिक्षण आणि सेवापुस्तक या विविध घटकांच्या आधारे गुणांकन करण्यात आले.

 

000

राजू धोत्रे / वि.स.अ

 

 

 

 

 

 

 

 

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*