अंशकालीन स्त्री परिचरांचे मासिक मानधन दुपट्ट

 

अंशकालीन स्त्री परिचरांचे मासिक मानधन दुपट्ट

अकोला, दि. २० : आरोग्य उपकेंद्रांमध्ये स्वच्छता राखणे, गृहभेटी देणे, गरोदर मातांना गोळ्यांचे वाटप करणे, गरोदर मातांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे अशा अनेक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचारांचे मासिक मानधन दुपट्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

यामुळे ३ हजारांचे मासिक मानधन थेट ६ हजार होणार असून स्त्री परिचरांना याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यासोबतच रुग्णांसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या स्त्री परिचरांच्या कार्याचा यथोचित सन्मान होणार आहे, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला आहे. दि. १ एप्रिल २०२६ पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी देखील केली जाणार आहे.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन