जिल्ह्यात एलपीजी गॅसची आवक नियमित

 जिल्ह्यात एलपीजी गॅसची आवक नियमित

अकोला, दि. १७ : जिल्ह्यात एलपीजी गॅसची नियमित आवक होत आहे. एलपीजी सिलेंडरची जिल्ह्यात रोज आवक असल्याने पुरवठा सुरळीत होत आहे. आजही आवक झाल्याने साठा वाढला आहे. 

मंगळवारीही आवक झाल्याने उपलब्ध साठ्यात सुधारणा झाली आहे. आजमितीला १५ हजार ५०३ सिलेंडर साठा उपलब्धता आहे. त्याचप्रमाणे, आवक नियमित सुरू आहे. पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी नऊ पथके गठित करण्यात आली असून, आवश्यक कार्यवाहीला गती देण्यात आली आहे, अशी माहिती पुरवठा कार्यालयातर्फे देण्यात आली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*