सामाजिक न्याय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ






  

सामाजिक न्याय योजनांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ

अकोला, दि. २५: जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाच्या सहकार्याने सामाजिक न्याय योजनांचे प्रदर्शनाचा शुभारंभ येथील उपविभागीय कार्यालय (तहसील) येथे आज झाला. शासनाकडून अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी गोपाळ वाघमारे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार कुणाल झाल्टे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी यावेळी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची नागरिकांना थेट माहिती व मार्गदर्शन मिळत असल्याने प्रदर्शन उपयुक्त आहे. अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी केले. सामाजिक न्याय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत असल्याने नागरिकांसाठी माहितीपूर्ण प्रदर्शन आहे, असे प्रतिपादन श्री. वाघमारे यांनी केले. श्री. पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.   

छायाचित्र प्रदर्शनामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती छायाचित्रे, माहिती फलक व दृकश्राव्य माध्यमांच्या साहाय्याने सादर करण्यात आली आहेत. अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी शिक्षण, स्वयंरोजगार, निवास व आर्थिक सहाय्य योजनांविषयी मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे प्रदर्शन दि. २७ मार्चपर्यंत सर्वांसाठी खुले असून नागरिक, अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थ्यांनी छायाचित्र प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आले.

0000000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*