पीएम किसान सन्मान निधीचे शुक्रवारी वितरण
पीएम किसान सन्मान निधीचे शुक्रवारी
वितरण
पंतप्रधानांच्या हस्ते देशस्तरीय
कार्यक्रमात वितरण; जिल्ह्यात थेट प्रक्षेपण
अकोला, दि. ११ : प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी योजनेच्या डिसेंबर 2025 ते मार्च 2026 कालावधीतील 22 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 13 मार्चला सायं.
5 वाजता गुवाहाटी येथील ज्योती-विष्णू
आंतरराष्ट्रीय केंद्र येथे होणार आहे.
केंद्र शासनाने शेतक-यांना
निश्चित उत्पन्न देण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना
माहे फेब्रुवारी 2019 पासून सुरु
केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) दोन हजार रू. प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात
प्रती वर्षी 6 हजार रू. त्यांच्या
आधार संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे.
पी. एम. किसान योजने अंतर्गत
राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापुर्वी एकूण 21 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 39,300 कोटीचा
लाभ जमा झालेला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
(पी. एम. किसान) योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाकडून लाभार्थीने भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी
प्रमाणिकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. राज्यातील सद्यस्थितीत या तीनही
बाबीची पूर्तता केलेल्या एकूण 91.19 लाख
शेतकरी कुटुंबांना दिनांक 13 मार्च, 2026 रोजी सुमारे रक्कम रुपये 1837.00 कोटी इतक्या रक्कमेचा
लाभ त्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.
राज्यातील कृषी विज्ञान केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर, कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध
कार्यालये, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs), शेतकरी उत्पादक संघटना (FPOs), सहकारी
पतसंस्था (PACS) याठिकाणी सदरचा समारंभ
आयोजित करण्यात येत आहे. नागरी सुविधा केंद्रांवरुनही या समारंभाच्या थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होता येईल.
राज्यांमध्ये सर्वदूर कृषी विभाग, महसूल व वने
विभाग,
तसेच ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने सदरचा
समारोह साजरा करण्यात येणार आहे. सदरच्या समारोहाचे थेट प्रक्षेपण केंद्र
शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंक वरून होणार आहे. सदरच्या लिंकचा वापर करून राज्यातील जास्तीत जास्त
शेतकरी बंधु भगिनींनी या समारोहामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा