जिल्हा रोजगार केंद्रातर्फे बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह; ८८ पदांसाठी भरती

जिल्हा रोजगार केंद्रातर्फे बुधवारी प्लेसमेंट ड्राईव्ह; ८८ पदांसाठी भरती

अकोला, दि. १७ : जिल्हा रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता केंद्रातर्फे प्लेसमेंट ड्राईव्ह उद्या (१८ मार्च) रोजी सकाळी ११ वा. होणार आहे. त्यात ४ नामांकित कंपन्यांसाठी ८८ पदांची भरती होईल, असे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी सांगितले.

मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय व पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी आहे. उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून मुलाखतीस प्रत्यक्ष उपस्थित राहावे. बायोडेटा, शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो व इतर आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, २रा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ०७२४-२४३३८४९ किंवा ७०२४२४१०९८ / ९४२१४२५०६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

---

ऑनलाईन सहभाग नोंदणी प्रक्रिया पुढीलप्रमाणे :
1. www.mahaswayam.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.
2. एम्प्लॉयमेंट टॅबवर क्लिक करा.
3. जॉब सिकर पर्याय निवडून सेवायोजन नोंदणी क्रमांक/आधार क्रमांक व पासवर्ड वापरून साईन इन करा.
4. होमपेजवरील जॉब फेअर पर्याय निवडा.
5. डिस्ट्रीक्ट मध्ये अकोला निवडून फिल्टर बटनावर क्लिक करा.
6. संबंधित मेळावा निवडून ह्युव व अप्लॉय बटनावर क्लिक करा.
7. पात्रतेनुसार पद निवडून अप्लॉय करा व ॲग्री पर्याय निवडा.
8. सक्सेसफुली ॲप्लाईड फॉर द जॉब असा संदेश दिसल्यावर नोंदणी पूर्ण होईल.

 ००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*