सणांच्या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू
सणांच्या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू
अकोला, दि. १६ : गुढीपाडवा, रमजान ईद आदी सण लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमातील कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.
जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी आदेश जारी केला. तो दि. २५ मार्चच्या रा. १२ पर्यंत लागू राहील. त्यानुसार कोणताही दाहक, स्फोटक पदार्थ वाहून नेण्यास, प्रक्षोभक घोषणा, किंकाळ्या फोडणे, दगड, शस्त्रे किंवा तशी साधने बाळगणे, मोर्चे, आंदोलन, शासनास निवेदन सादर करण्यासाठी पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा