जागतिक महिलादिन रोजगार मेळाव्यात ५४ उमेदवारांची निवड




 

जागतिक महिलादिन विशेष रोजगार मेळाव्यात ५४ उमेदवारांची निवड

अकोला, दि. ११ : जागतिक महिलादिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास केंद्राने घेतलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय मेळाव्यात ५४ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

डॉ. आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केवळ महिलांसाठी हा मेळावा मंगळवारी झाला. १५४ पदांच्या मागणीसाठी २३४ उमेदवारांनी अर्ज केले होते. प्रत्यक्ष १४३ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यातील ५४ उमेदवारांची निवड झाली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षण पूर्ण करून आरोग्य विभागात दीर्घकालीन कंत्राटी नोकरी मिळालेल्या वैष्णवी भागवत व रसिका धंदरे यांना यावेळी गौरविण्यात आले.

सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी संतोष साळुंखे, वैशाली देशपांडे, प्राचार्य शरदचंद्र ठोकरे नागेश देशपांडे, पूनम रजाने आदी उपस्थित होते. प्रशांत बोकाडे यांनी आभार मानले.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*