अभियानाच्या पहिल्या दिवशी चार हजारपेक्षा अधिक दाखल्यांचे वाटप


अकोला, दि. 7 : जिल्ह्यातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा‑1’ राबविण्यात येत असून, अभियानाच्या पहिल्या दिवशी अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत एकूण 7 महसूली मंडळ मुख्यालयी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले होते . या आवाहनाला अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपस्थिति नोंदवली व अभियानांद्वारे दिलेल्या सेवेचा लाभ घेतला या शिबिरांमध्ये सात‑बारा, नमुना‑8, नामबदल, महसूल कर, वन‑विभागाच्या मान्यता, नाहरकत प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र , श्रावण बाळ योजनेचा लाभ , संगायो योजना , पुरवठा विभागमार्फत रेशन कार्ड वाटप अशा अनेक महसूल आणि इतर सरकारी सेवांचा लाभ एकाच ठिकाणी प्रदान करण्यात आला. त्यामुळे शेतकरी बांधव व नागरिकांना कार्यालयात चकरा मारण्याची आता गरज राहणार नाही. जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. इतर शासकीय विभागही या अभियानामध्ये सहभागी झाले . त्यामुळे विविध दाखले, लाभ आदी मिळून प्रलंबित बाबींचे निराकरण होण्यास मदत झाली. अभियानाच्या पहिल्या दिवशी अकोला तालुक्यात दहीहंडा व घुसर , पातुर तालुक्यात आलेगाव , बाळापुर तालुक्यात उरळ , मुर्तीजापुर तालुक्यात जामठी , अकोट तालुक्यात मुंडगाव , तेल्हारा तालुक्यात पाथर्डी या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थिती मध्ये शिबिरे आयोजित केली होती . अकोट तालुक्यातील मुंडगाव व तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील समाधान शिबिरांचे उद्घाटन अकोट-तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. प्रकाश भरसाकळे यांनी केले. तर पातुर तालुक्यातील आलेगाव येथील शिबिराची सुरुवात अपर जिल्हाधिकारी श्री. प्रमोद गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आली. अभियानाच्या पहिल्या दिवशी अकोला जिल्ह्यात एकूण 432 फेरफार निकाली काढण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात एकूण 200 सात बारा अभिलेखामध्ये 155 अंतर्गत दुरुस्ती करण्यात आली. अभियानांतर्गत पहिल्या दिवशी लाभार्थी यांला एकूण 2312 सात-बारा वाटप , 1817 8-अ वाटप , एकूण 4836 विविध प्रमाणपत्रांचे वाटप वाटप करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*