'हिंद-दी -चादर' भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे अकोला येथे आयोजन नृत्य, नाट्य, गीतांच्या या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा... - सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे
'हिंद-दी -चादर'
भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे अकोला येथे आयोजन
नृत्य, नाट्य, गीतांच्या या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा...
- सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे
मुंबई -दि.20:- श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्ताने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात हिंद-दी -चादर' या नृत्य नाट्य, गीतांच्या
भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 21मार्च रोजी प्रमिलाताई ओक सभागृह सायं.7 वाजता येथे करण्यात आलेले आहे.
हिंद-दी -चादर
श्रीगुरु तेग बहादुर जी यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.त्यांचे जीवनकार्य संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच त्यांना हिंद दी चादर (हिंदुस्थानचे रक्षण करणारी ढाल) असेही संबोधले जाते. म्हणूनच श्रीगुरू तेग बहादूर यांच्या शहिदीच्या ३५०व्या वर्षपूर्तीनिमित्त श्रीगुरू तेग बहादूर यांच्या बलिदानाची आठवण ठेवणे, त्यांच्या विचारांचा प्रसार करणे तसेच समाजात एकता, बंधुता आणि आध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करणे असा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश.
जो विविध धर्म, संप्रदाय व समाजघटकांना एकत्र आणणारा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार आहे.
राज्यात आठ ठिकाणी आयोजन
पंजाबी भक्ती गीत,भांगडा नृत्य आणि नाट्यमय प्रसंग अशा कलाविष्कारांनी युक्त 60 कलावंतांनी साकारलेला हा सांस्कृतिक सोहळा आहे.या हिंद दी चादर सांस्कृतिक कार्यक्रमाचे राज्यात केवळ आठ ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे.वाशी, मिरा रोड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगांनंतर आता अकोला, नागपूर, नाशिक आणि पिंपरी चिंचवड येथे हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
या कार्यक्रमात सिने नाट्य क्षेत्रातील मान्यवर कलावंत आहेत. हा सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असून नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य शासन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभाग संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
.....

.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा