सामाजिक न्याय विभागातर्फे पुरस्कारासाठी अर्ज मागविले

 

सामाजिक न्याय विभागातर्फे पुरस्कारासाठी अर्ज मागविले

अकोला, दि. ९ : सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य करणा-यांना सामाजिक न्याय विभागातर्फे विविध पुरस्कार दिले जातात. त्यासाठी इच्छूकांनी दि. १५ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सहायक आयुक्त एम. जी. वाठ यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्यश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या ७ पुरस्कारांसाठी, तसेच २०२४-२५ व २५-२६ या कालावधीसाठी अर्ज मागविले आहेत.

इच्छूकांनी अर्ज चार प्रतीत पोलीसांच्या चारित्र्य पडताळणी दाखल्यासह सहायक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अकोला येथे पाठवावा.

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*