किडनीच्या सुरक्षिततेसाठी योग्य सवयी आवश्यक

 

किडनीच्या सुरक्षिततेसाठी योग्य सवयी आवश्यक

 

दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक मुत्रपिंड आरोग्य दिन  साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांमध्ये मुत्रपिंडांच्या (किडनीच्या) आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि किडनीचे आजार टाळण्यासाठी योग्य सवयी अंगीकारण्यास प्रेरित करणे हा आहे.

 

मुत्रपिंडाचे महत्त्व

 

मानवी शरीरात दोन मुत्रपिंडे असतात. ती रक्तातील अपायकारक पदार्थ व अतिरिक्त पाणी गाळून लघवीद्वारे बाहेर टाकण्याचे काम करतात. तसेच शरीरातील पाणी-मीठ संतुलन राखणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीत मदत करणे हीही त्यांची महत्त्वाची कार्ये आहेत.

 

मुत्रपिंडाचे आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य आहार, निरोगी जीवनशैली आणि वेळेवर तपासणी यामुळे किडनीचे आजार टाळता येतात.

मुत्रपिंड विकार लक्षणे -

लघवीत बदल: खूप जास्त किंवा खूप कमी लघवी होणे, लघवीतून फेस येणे किंवा रक्त जाणे।

सूज : पाय, घोटे, हात किंवा डोळ्यांच्या खाली सूज येणे।

थकवा आणि अशक्तपणा: सतत थकवा जाणवणे किंवा ऊर्जा कमी वाटणे

त्वचेवर खाज: त्वचेवर सतत खाज सुटणे

मळमळ आणि उलटी: भूक न लागणे, वजन कमी होणे आणि मळमळ वाटणे

स्नायू पेटके: स्नायूंमध्ये पेटके येणे।

श्वास घेण्यास त्रास: फुफ्फुसात द्रव साचल्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे

झोपेच्या समस्या: निद्रानाश किंवा झोपेत समस्या

 

 

 मुत्रपिंडाच्या आजारांची प्रमुख कारणे

 

1. *मधुमेह (डायबेटीस)* – दीर्घकाळ नियंत्रणात नसलेला मधुमेह किडनीला हानी पोहोचवतो.

2. *उच्च रक्तदाब* – रक्तदाब वाढलेला असल्यास किडनीवरील ताण वाढतो.

3. *अयोग्य आहार व जीवनशैली* – जास्त मीठ, तेलकट पदार्थ आणि कमी व्यायाम यामुळे किडनीचे आरोग्य बिघडू शकते.

4. *धूम्रपान व मद्यपान* – या सवयींमुळे रक्तवाहिन्यांवर व किडनीवर परिणाम होतो.

5. *काही औषधांचा अति वापर* – वेदनाशामक औषधे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो.

 

प्रतिबंधासाठी उपाय

 

* दररोज पुरेसे पाणी पिणे.

* संतुलित व पौष्टिक आहार घेणे.

* नियमित व्यायाम करणे.

* रक्तदाब व रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे.

* धूम्रपान व मद्यपान टाळणे.

* डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे न घेणे.

* नियमित आरोग्य तपासणी करून घेणे.

 

 

 

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*