‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण




 ‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण

नियोजनभवनात सामूहिक गायन; शहिदांना अभिवादन

अकोला, दि. २३ : ‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनभवनात ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन झाले.

थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड , मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार उपस्थित होते.

सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा ठरले. आजही व सदैव हे गीत युवकांसाठी स्फूर्तीदायी आहे, अशी भावना विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*