जिल्ह्यात उष्मालाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे आवाहन
जिल्ह्यात उष्मालाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे आवाहन
अकोला, दि. १० : नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात
पुढील काळात उष्मालाट उद्भभवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी
दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
काय करावे
*तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
*हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावे.
*बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चप्पलाचा वापर करण्यात यावा.
*प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
*उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी, स्कार्फ, टॉवेल
वापर करण्यात यावा.
*शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक
इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा.
*अशक्तपणा, सुस्तीपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उष्ण लागण्याची
चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
*पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना
पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
*घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.
*विविध शासकीय व खाजगी संस्थांनी कामाच्या ठिकाणी जवळ थंड पिण्याच्या
पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
*गर्भवती महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
*उष्माघाताचे लक्षण दिसताच तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
काय करू नये
*लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क
केलेल्या वाहनात ठेवू नये.
*दुपारी 12.00 ते 4.00 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
*गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
*बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
*उन्हाळ्याच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या
हवेसाठी स्वयंपाक घराचे दरवाजे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
*उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये, मद्य सेवन, चहा, कॉफी
आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेऊ नये. त्यामुळं डिहायड्रेशन होते.
*उन्हात वाहन शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थांपासून शक्यतो दूर
राहावे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा