दिव्यांगांना अनुदानासाठी प्रमाणपत्र अपलोड करण्याचे आवाहन

 

 

 दिव्यांगांना अनुदानासाठी प्रमाणपत्र अपलोड करण्याचे आवाहन

अकोला, दि. १७ : दिव्यांग लाभार्थ्यांनी अनुदान मिळण्यासाठी युडीआयडी कार्ड- दिव्यांग प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड करण्याचे आवाहन पातूर तहसीलदारांनी केले आहे.

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात एक हजार रू. ची वाढ करून ते अडीच हजार रू. झाले आहे व ते डीबीटीद्वारे वितरित होते. हा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र, अपडेट केलेला आधार क्रमांक, बँकेचे पासबुक प्रत आदी कागदपत्रे तलाठी किंवा संजय गांधी योजना, तहसील कार्यालय, पातूर येथे दि. २० मार्चपूर्वी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा