राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य; अकोला जिल्ह्यातील ४३ खेळाडूंना शिष्यवृत्ती, २१ बॉक्सिंगपटूंची चमक
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य; अकोला
जिल्ह्यातील ४३ खेळाडूंना शिष्यवृत्ती, २१ बॉक्सिंगपटूंची चमक
अकोला-राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय
कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील खेळाडूंना महाराष्ट्र शासनाकडून मोठा दिलासा मिळाला असून
एकूण ४३ खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विशेष म्हणजे
२१ खेळाडू बॉक्सिंग या क्रीडा प्रकारातील असून जिल्ह्यातील बॉक्सिंग खेळाची वाढती ताकद
अधोरेखित झाली आहे.
राष्ट्रीय
स्तरावर सहभाग नोंदवून प्राविण्य मिळवणाऱ्या या खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळणार असल्याने
त्यांच्या पुढील प्रशिक्षणास मोठी चालना मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन
देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत राष्ट्रीय स्तरावरील सहभाग व प्राविण्यानुसार(सुवर्ण
पदक 11250₹, रजत पदक 8950₹, कांस्य पदक 6750₹ तसेच सहभागी खेळाडूंना 3750₹)विविध रकमेची
शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यामुळे खेळाडूंच्या प्रशिक्षण, आहार व साहित्य खर्चास मदत
होते.
या यादीत विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंचाही समावेश आहे. मात्र बॉक्सिंगमध्ये
सर्वाधिक २१ खेळाडूंनी शिष्यवृत्ती मिळवत आघाडी घेतली आहे.
पालक व प्रशिक्षकांनीही शासनाच्या या उपक्रमाचे
स्वागत करत खेळाडूंना मिळणारे आर्थिक बळ अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
या शिष्यवृत्तीमुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळणार असून अधिकाधिक
विद्यार्थी क्रीडा क्षेत्राकडे वळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा क्रीडा अधिकारी
मा. सतीशचंद्र भट्ट यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
दिल्या.
०००
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा