अकोल्यात २८-२९ मार्चला अमृतपेठ थेट बाजारपेठ सोबत मोफत आरोग्य तपासणी शिबिर
अकोल्यात २८-२९ मार्चला अमृतपेठ थेट बाजारपेठ
सोबत मोफत आरोग्य तपासणी शिबिर
अकोला, दि. २० : स्थानिक उद्योजकांना सक्षम व्यासपीठ मिळावे आणि नागरिकांना
दर्जेदार उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करता यावीत, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन,
उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीतर्फे (अमृत) ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ- हा उपक्रम २८ व २९
मार्चला अकोल्यात होईल.
या विशेष बाजारपेठेत स्वादिष्ट खाद्यपदार्थ, ट्रेंडी व पारंपरिक कपडे,
घरगुती उपयोगाच्या वस्तू, कलात्मक हस्तकला, दागदागिने तसेच अनेक स्थानिक उत्पादनांचा
समावेश या प्रदर्शनात असेल. त्यामुळे खरेदीप्रेमींसाठी हा एक वेगळाच आणि आनंददायी अनुभव
ठरणार आहे.
मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय,
अकोला यांच्या अंतर्गत मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. या
शिबिरामध्ये नामांकित तज्ज्ञ डॉक्टर चा मार्फत
नागरिकांना सेवा देणार आहेत. नागरिकांची
मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल.
स्थानिक उत्पादकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत आपला व्यवसाय विस्तारावा.
तसेच नागरिकांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक लघुउद्योजकांना प्रोत्साहन
द्यावे आणि खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे अकोला जिल्हा व्यवस्थापक
धनंजय कुळकर्णी यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा