समाजकल्याण कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

समाजकल्याण कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

अकोला, दि. २० : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह शताब्दी वर्ष, तसेच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त एम. जी. वाठ यांनी दिली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून उपक्रमाचा शुभारंभ झाला. उपक्रमात सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय निवासी शाळा, वसतिगृहे, कार्यालये येथे दि. २० ते २२ मार्चदरम्यान महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह व भारतीय संविधान या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, व्याख्याने, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, लघुनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*