हिवरखेड येथील रोजगार मेळाव्यास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला, दि. 28 (जिमाका)- नेहरू युवा केंद्र व आकांक्षा युवा मंडळ हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा करियर मार्गदर्शन व रोजगार मेळावा दि. 26 फेब्रुवारी रोजी सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड ता. तेल्हारा येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कारपोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्रातील कंपन्यानी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले. या मेळाव्यात ऑनलाईन नोंदणीव्दारे 288 तर प्रत्यक्षात 212 तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी 52 तरुणांचे प्राथमिक मुलाखती घेऊन 31 तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. या मेळाव्यात सीसीडी, एल.एफ. लॉजिस्टिक, युआयडीआयए प्रोजेक्ट, टेक महिंद्रा इत्यादी उद्योग कंपन्यांनी सहभाग घेतला. मेळाव्यामध्ये मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले. यामध्ये राजीव खारोडे यांनी स्प...