लॉकडाऊन ३१ जुलै पर्यंत कायम -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश
अकोला , दि.३० ( जिमाका)- महाराष्ट्र शास नाच्या महसूल व वन विभा गाच्याआदेशानुसार दि . ३१ जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊन चा कालावधी वाढविण्यात आला असून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यासंदर्भात दि . ०२ जून २०२० रोजी पारीत केलेले आदेश दिनांक ३१ जूलै २०२० चे मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्यात येत असल्याचे आदेश आज निर्गमित केले आहेत . हे आदेश दिनांक ०१/०७/२०२० चे ००.०० वा. पासून ते दिनांक ३१/०७/२०२० चे २४.०० वा. पर्यंत संपूर्ण अकोला शहर व जि ल्ह्या तील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. १. रात्रीची संचारबंदी - संचारबंदीच्या आदेशाचे पालन करतांना कुठल्याही व्यक्ती , नागरिंकांना हालचाल करण्याकरीता व मुक्त संचार करण्याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत रात्री ९.०० ते सकाळी ५.०० वा . पर्यंत सक्त मनाई करण्यात आली आहे. २. या कार्यालयाचे दिनांक २७.०६.२०२० च्या आदेशान्वये ...