दाळंबी तलावासाठी इच्छूक मत्स्यव्यवसाय संस्थांचे अर्ज मागविले

 अकोला, दि. २४ : अकोला तालुक्यातील दाळंबी साठवण तलावाचे जलक्षेत्र ५९.९७ हे. आहे. या तलावाचे मासेमारी हक्क मृद व जलसंधारण विभागातर्फे मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

या तलावासाठी नोंदणी करण्यासाठी इच्छूक मत्स्यव्यवाय सहकारी संस्थांनी परिपूर्ण प्रस्ताव ३० दिवसांच्या आत सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), शासकीय दूध डेअरी, मूर्तिजापूर रस्ता, अकोला येथे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जलाशयाच्या बाधित गावातील १० किमी परिघाच्या परिसरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त, महिला, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती, जमाती यांचा प्रस्तावात समावेश असणे आवश्यक आहे.

०००

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन