डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना अर्ज करण्याचे आवाहन

 

डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना

अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. 3 : अल्पसंख्याक विकास विभागातर्फे डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत सन 2025-26 या वर्षाकरिता विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

इच्छुक मदरशांनी शासन निर्णयानुसार विहीत नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हा नियोजन समिती, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे दि. १४ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव 2 प्रतीत कार्यालयीन वेळेत सादर करावा. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जिल्‍हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा