बालगृहातील 110 मुलांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग
बालगृहातील 110 मुलांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग
अकोला, दि. 17: महिला व बालविकास विभाग, बाल संरक्षण कक्ष, सुर्योदय
बालगृह, मैत्री नेटवर्क, सुखाय फाऊंडेशन व एन्करेज एज्युकेशनल फाऊंडेशनतर्फे बालहक्क
सप्ताहानिमित्त सुर्योदय बालगृहाच्या प्रांगणात रविवारी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
त्यात बालगृहातील 110 मुलांना सहभागी होऊन सुंदर चित्रे रेखाटली.
उपक्रमाचा उद्देश स्पर्धेचा नसून, मुलांच्या गुणांना वाव देणे हा आहे.
खेळात हार-जीत महत्वाची नसून, सहभागी होणे हेच महत्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रोशनी बन्सल यांनी यावेळी केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, ॲड.
अनिता गुरव, प्रांजली जयस्वाल, सारिका वानखडे, नितेंद्र उंबरकर, राजू लाडुलकर आदी उपस्थित
होते. सुर्योदय बालगृहाचे अधिक्षक शिवराज खंडाळकर पाटील यांनी प्रास्ताविक केले.
राधा कात्रे, दिव्या जी., सपना खंडारे, गौरी सरोदे, दिनेश लोहकार, पद्माकर मोरे, ऋतुजा घ्यार,
दीपक लुंगे,जयश्री इखारे, रेखा बावणे, सचिन सातपुते, राधिका कोरडे, आम्रपाली अंभोरे,
साधना इंगळे, विनोद गावडे, गणेश हिवराळे, शुभांगी लाहुडकर, रोशन चोरे, महेंद्र गणोदे
आदींना सहकार्य केले.
०००
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा