जिल्ह्यातील वाळूघाट लिलावाचे सुधारित वेळापत्रक ऑनलाईन स्वीकृतीची मुदत 14 नोव्हेंबरपर्यंत

 

जिल्ह्यातील वाळूघाट लिलावाचे सुधारित वेळापत्रक

ऑनलाईन स्वीकृतीची मुदत 14 नोव्हेंबरपर्यंत

अकोला, दि. 6 : जिल्ह्यातील 15 वाळू घाट लिलाव यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. ई-लिलावाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, शुद्धीपत्रक निर्मगित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लिलावधारकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

 

ई- निविदा ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत दि. 6 नोव्हेंबर रोजी दु. 2 पर्यंत  होती. ती आता दि. 14 नोव्हेंबर रोजी दु. 2 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ई-निविदा (तांत्रिक लिफाफा) उघडणे, तत्पूर्वीची तांत्रिक पडताळणी आदी प्रक्रिया सुधारित वेळापत्रकानुसार दि. 17 नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. ई- लिलाव प्रक्रिया (ई-ऑक्शन) दि. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. पासून दु. 1 वा. पर्यंत पूर्ण करण्यात येईल. अधिकाधिक लिलावधारकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रक शासनाच्या महाटेंडर्स, तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एकूण 15 वाळूघाट

अकोला तालुक्यातील कपिलेश्वर, वडद खु., एकलारा. कट्यार, म्हैसांग हे पूर्णेवरील 5 घाट, तसेच उगवा येथील मोर्णेवरील घाटाचा समावेश आहे. अकोट तालुक्यात केळीवेळी व पिलकवाडी येथील पूर्णेवरील घाटांचा समावेश आहे. बाळापूर तालुक्यात निंबी, बहादूरा,  सागद, लोहारा-1. डोंगरगाव या मन नदीवरील, तसेच नागद या पूर्णेवरील आणि मांजरी येथील कांचनपूर्णेच्या घाटाचा समावेश आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा