सैनिक कल्याण विभागात लिपिकांची भरती; माजी सैनिकांना संधी
सैनिक कल्याण विभागात लिपिकांची भरती; माजी सैनिकांना संधी
अकोला, दि. 13 : सैनिक कल्याण विभाग व विभागात जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालयांसाठी सरळसेवेने लिपिक टंकलेखक पदांची भरती होत आहे. त्यासाठी केवळ माजी सैनिकांकडून
दि. 26 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
यापूर्वी प्रसारित भरतीच्या सूचनेमध्ये ५ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची
शेवटची तारीख होती. तथापि, जास्तीत जास्त उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळण्यासाठी
मुदतवाढ देण्यात आली असून, दि. २६ नोव्हेंबर रोजी रा. २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज
करता येईल. तरी जिल्ह्यातील पात्र आणि इच्छुक माजी सैनिकांनी या संधीचा जास्तीत जास्त
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद शरद पाथरकर यांनी केले
आहे.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा