अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अद्ययावतीकरणामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी अफवांवर विश्वास ठेवू नका - व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

 

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

अद्ययावतीकरणामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी

अफवांवर विश्वास ठेवू नका

-         व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

अकोला, दि. 12 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद झाल्याच्या व व्याज परतावा थांबविण्यात आल्याच्या अफवा काही समाजकंटकांकडून समाजमाध्यमांतून पसरवल्या जात आहेत. त्यात कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु आहेत, असे स्पष्टीकरण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.

 

महामंडळाच्या सर्व योजना नियमित सुरू आहेत. त्याचप्रमाणे, वेब प्रणालीचे अद्ययावतीकरण सुरू असून

सेवा 15 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत देण्याचे बंधन महामंडळाने स्वत: वर घालून घेतले आहे. याबाबत आवश्यक ते बदल वेब प्रणालीमध्ये करणे सुरु आहे. एजंटमार्फत लाभार्थ्यांची होणारी आर्थ‍िक पिळवणूक थांबावी यासाठी म्हणून महामंडळाने सामाईक सेवा केंद्रांद्वारे फक्त 70 रुपयांत सेवा उपलब्ध करण्यात येत आहेत. मोबाईल ॲप्लिकेशनही विकसित होत आहे.

एजंटमार्फत लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने, सद्य:स्थितीत नाशिक व अहमदनगरमध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंदवले आहेत. असे प्रकार घडू नयेत यासाठी वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरु आहे. अद्ययावतीकरणामुळे लाभार्थ्यांना सुरळीत व सहजपणे व्याज परतावा मिळणार आहे. यापूर्वी व्याज परताव्याकामी लाभार्थ्यांना एका वेळेस कमाल 3 क्लेम सादर करता येत होते. मात्र सद्यस्थितीत लाभार्थ्यांना एका वेळेस कमाल 6 क्लेम सादर करता येत आहेत. त्याशिवाय, ऑनलाईन परिपूर्ण माहिती, ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या राजकीय, दिशाभूल करणाऱ्या किंवा अफवांवर आधारीत माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा