मूर्तिजापूर येथे क्षयरुग्णांना पोषण आहार कीटचे वाटप
मूर्तिजापूर येथे
क्षयरुग्णांना पोषण आहार कीटचे वाटप
मूर्तिजापूर, दि. ३ : श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उप जिल्हा रुग्णालय येथे क्षयरुग्णांना आमदार हरिष पिंपळे यांच्या हस्ते पोषण आहार कीटचे वाटप करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ राजेंद्र नेमाडे, नंदुभाऊ राऊत,
हर्षल साबळे, बंडूभाऊ लांडे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम
अंतर्गत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत “निक्षय
मित्र” उपक्रम सुरु आहे.
क्षय् रुग्णांना सामुदायिक सहाय्य हा आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाचा एक महत्वाचा उपक्रम
आहे. रुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे या करिता आमदार हरिष पिंपळे यांनी क्षय रुग्णांना
दत्तक घेऊन पोषण आहार कीट वाटप करण्यात आले.
पोषण आहार कीटमध्ये गहू, तुरडाळ, शेंगदाणे, तेल, मटकी,
गूळ आदींचा समावेश असतो. हा उपक्रम डॉ बळीराम
गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा मार्गदर्शनात सुरु आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ
सुधीर कराळे,राजेंद्र दारोकार, वसंत उन्हाळे, हरिष बंड, सचिन पाटील आदींचे उपक्रमाला
सहकार्य लाभले.
समाजातील सहकारी संस्था, कॉर्पोरेट कंपनी, एनजीओ, वैयक्तिक
व्यक्ती, लोकप्रतिनिधी या सर्वांनी उपक्रमामध्ये सहभागी होऊन निक्षय मित्र बनवून क्षय
रुग्णांना सहाय्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांनी केले
आहे
०००



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा