रब्बी हंगाम 2025-26 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
प्रधानमंत्री पीक विमा योजना
रब्बी हंगाम 2025-26
मध्ये शेतकऱ्यांनी
सहभागी व्हावे.
पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी
महाराष्ट्र शासनाने राज्यात खरीप 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करीता
अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन उत्पादनावर
आधारीत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने
घेतलेला आहे.
रब्बी हंगाम २०२५-२६ गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी
भुईमुग व रब्बी
कांदा ( ६ पिके ) या अधिसूचित
पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.
सदर योजनेतील सहभाग
हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची
अंतिम मुदत रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत)
करिता दिनांक 30 नोव्हेंबर,२०२5 , गहु
(बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकाकरिता दिनांक 15 डिसेंबर,२०२5 व
उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या पिकाकरिता दिनांक 31 मार्च,२०२6 अशी
आहे. त्यासाठीचे PMFBY पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.
कर्जदार शेतक-यांना योजनेत सहभागी होण्यासाठी
कर्ज मंजूर करणाऱ्या बँकमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी
विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. जर कर्जदार शेतक-यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल
तर तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या
सात दिवस आधी कर्ज मंजूर
करणा-या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे. जे
शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत
त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.
यासाठी सर्व शेतक-यांना आवाहन
करण्यात येते की, रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे पोर्टलवर https://pmfby.gov.in
स्वत:
शेतकरी यांनी अथवा बँक, विमा
कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इंन्शुरन्स ॲप व सामुहिक सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत
योजनेतील सहभागाची नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी तात्काळ आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि
अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी यांचेशी संपर्क साधावा.
योजना कार्यान्वयीन यंत्रणा :
|
अ. क्र. |
समुह क्र. |
समाविष्ट जिल्हे |
नियुक्त
केलेली विमा कंपनी |
|
1 |
1 |
अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर |
भारतीय कृषि विमा कंपनी पत्ता : मुंबई
क्षेत्रिय कार्यालय, लोकचेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र- 400 059 ई-मेल : pikvima@aicofindia.com |
|
2 |
2 |
सोलापूर, जळगाव, सातारा |
|
|
3 |
3 |
परभणी,
वर्धा, नागपूर |
|
|
4 |
4 |
जालना,
गोंदिया, कोल्हापूर |
|
|
5 |
5 |
नांदेड,
ठाणे, रत्नागिरी,
सिंधुदुर्ग |
|
|
6 |
6 |
छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड |
|
|
7 |
7 |
वाशिम,
बुलडाणा, सांगली,
नंदुरबार |
|
|
8 |
8 |
हिंगोली, अकोला, धुळे, पुणे |
|
|
9 |
9 |
यवतमाळ, अमरावती, गडचिरोली |
|
|
10 |
10 |
धाराशिव |
आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शुरन्स
कं. लि. पत्ता: माणिकचंद आयकॉन, 3 रा मजला, प्लॉट नं. 246, सी विंग, बंडगार्डन, पुणे- 411001 ई-मेल: ICICILOMPMFBYMH@icicilombard.com |
|
11 |
11 |
लातूर |
|
|
12 |
12 |
बीड |
तरी रब्बी हंगाम 2025-२६ मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा