विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी वर्षा मीना
















 

 

जिल्हास्तरीय एकता पदयात्रेला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वपूर्ण

-       जिल्हाधिकारी वर्षा मीना

 

 अकोला, दि. ११ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त   ‘सरदार@१५०’ उपक्रमात जिल्हा प्रशासन, केंद्रीय क्रीडा मंत्रालय, मेरा युवा भारत केंद्र व विविध संघटनांच्या सहभागाने जिल्हास्तरीय पदयात्रा आज शहरात काढण्यात आली. विद्यार्थी व युवकांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिलाभगिनी आदी उस्फूर्तपणे पदयात्रेत सहभागी झाले होते.

 

वसंत देसाई स्टेडियम येथे जिल्हास्तरीय वर्षा मीना यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून पदयात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी जयंत मसने, सिद्धार्थ शर्मा, रमेश अलकरी, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, मेरा भारत युवा केंद्राचे महेशसिंग शेखावत आदी उपस्थित होते.

विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.

 

 

प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती मीना व विविध मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर जिल्हाधिका-यांच्या हस्ते मशाल प्रज्ज्वलित करण्यात आली. विविध देशभक्तीपर गीते, ’भारतमाता की जय’च्या जयघोषात वसंत देसाई क्रीडांगण येथे पदयात्रेचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांच्यासह विविध मान्यवर पदयात्रेत पूर्णवेळ सहभागी होते. सर्व क्षेत्रातील नागरिक उत्स्फूर्तपणे पदयात्रेत सहभागी झाले होते.

ही पदयात्रा पुढे अग्रसेन चौक, शहिद अब्दुल हमीद चौक, शहर कोतवालीकडून जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला.  

यावेळी एन.एस.एस , एन.सी.सी., जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला, अकोला महानगरपालिका, शिक्षण विभाग, श्री. शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, श्री. आर. एल. टी. महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भारत कला विद्यालय, विविध सेवाभावी संस्था, युवा मोठ्या संख्येने  सहभागी सहभागी झाले होते.  

 

प्रास्ताविक  विकास जाधव यांनी   तर जिल्हा युवा अधिकारी  महेश सिंह शेखावत यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे संचालन विशाल राखोंडे यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश अलकरी, मेरा युवा भारत केंद्र, अकोलाचे कार्यालयाचे लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक  मदन घेघाटे,  सागर चौधरी, सागर राखोंडे, श्याम उगले, रवी कढोने, हर्षल काटोले, आकाश गवई तसेच सर्व महाविद्यालय, शाळांचे, शिक्षक यांनी सहकार्य केले.  या पदयात्रेमध्ये जिल्ह्यातील  युवा,   मेरा युवा भारत स्वयंसेवक  मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थित होते.

 

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा