'वंदे मातरम' रचनेची सार्ध शताब्दी शास्त्री क्रीडांगणावर निनादला भारतभूमीच्या गौरवाचा सूर हजारो विद्यार्थी एकाचवेळी गायले'वंदे मातरम'
'वंदे मातरम' रचनेची सार्ध शताब्दी
शास्त्री क्रीडांगणावर निनादला भारतभूमीच्या गौरवाचा सूर
हजारो विद्यार्थी एकाचवेळी गायले'वंदे
मातरम'
अकोला, दि. 7 : स्वातंत्र्य सेनानी
व थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी क्रांतीची जाज्वल्य ज्योत आपल्या गीतातून सबंध देशभर
पेटवली. 'वंदे मातरम' या गीत रचनेला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित अकोला येथील
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलांची व मुलींची यांच्या लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर
हजारो विद्यार्थी, तरुणांच्या उपस्थितीत 'वंदे मातरम' गायनाचा सामूहिक सोहळा संपन्न
झाला. वंदे मातरम् पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना,मुख्य
कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम,मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, कौशल्य रोजगार उद्योजकता
व नाविन्यता विभाग सहायक उपायुक्त दत्तात्रय ठाकरे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
अधिकारी संतोष साळुंके, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, तहसीलदार सुरेश कव्हळे,शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) प्राचार्य शरदचंद्र ठोकरे आदी उपस्थित होते.
०००


.jpeg)

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा