शासकीय आश्रमशाळांत रिक्त पदांवर भरती
शासकीय आश्रमशाळांत रिक्त पदांवर भरती
अकोला, दि. ३ : अकोला येथील
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या
अकोला, वाशिम व बुलडाणा या जिल्हयामधील शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात
भरण्यात येत आहेत.
पदभरतीसाठी बाहयस्त्रोत संस्था मे. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार
सेवा सहकारी संस्था व मे. महाराष्ट्र विकास ग्रुप यांना आदेश देण्यात आले आहेत. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्पात एकूण 8 शासकीय आश्रमशाळा येत असुन सदर आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षक ,
पदविधर प्राथमिक शिक्षक, व माध्यमिक शिक्षक या रिक्त पदावर (कंत्राटी पदे) पात्र उमेदवारांना https://mvgcompany.in
सदर लिंकवर
अर्ज करण्यासाठी आवहन करण्यात येत आहे.
उच्च माध्यमिक शिक्षक (भौतिकशास्त्र),
माध्यमिक शिक्षक (मराठी व विज्ञान), पदवीधर प्राथमिक शिक्षक (इंग्रजी), प्राथमिक
शिक्षक (सर्व विषय) तरी इच्छुक पात्र
उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करण्याची कार्यवाही दि. 8 नोव्हेंबरपूर्वी
करावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले.
अपर आयुक्त नाशिक व ठाणे - https://scsmltd.com/
अपर आयुक्त, अमरावती व नागपुर- https://mvgcompany.in
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा