एमआयडीसीमध्ये लीड बँकेतर्फे एमएसएमई क्रेडिट आऊटरिच शिबिर

 

एमआयडीसीमध्ये लीड बँकेतर्फे

एमएसएमई क्रेडिट आऊटरिच शिबिर

अकोला, दि. २० : स्थानिक उद्योजक, सूक्ष्म-लघु उद्योग व्यावसायिक व नवउद्योजकांना व्यवसायवाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन व अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अकोला कार्यालय आणि इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एमएसएमई क्रेडिट आऊटरिच शिबिर दि. २१ नोव्हेंबरला सकाळी ११.३० वाजता एमआयडीसीतील अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात होणार आहे.

खासदार अनुप धोत्रे, महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक बुवनेश्वरी एस. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. एमएसएमईचे कर्ज सुविधा व पात्रता, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम,मुद्रा व इतर सरकारी योजना, डिजिटल पेमेंट व उद्यम नोंदणी प्रक्रिया, महिला उद्यमीसाठी विशेष योजना, उद्योग वाढीसाठी वित्तीय साक्षरता आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

    स्थानिक उद्योजक, व्यावसायिक आणि स्टार्ट-अप्सनी या संधीचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी नजीकच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक नयन सिन्हा यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा