महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ आदेश

अकोला, दि. 30 : नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक २०२५ प्रक्रीया सुरु झालेली आहे. दि. २ डिसेंबर रोजी मतदान व दि. ३ डिसेंबर  रोजी मतमोजणी व दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी निकाल प्रसिध्दी करण्यात येणार आहे.  अकोला जिल्ह्यात वरिल काळामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी कलम ३६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार प्राप्त असलेले अधिकारान्वये नगर परिषद, नगर पंचायत बाळापुर, मुर्तिजापुर, अकोट, तेल्हारा, हिवरखेड, बार्शिटाकळी तालुक्यातील सर्व पोलीस उपनिरिक्षक व त्यांचेपेक्षा वरिल दर्जाचे अधिकाऱ्यांना दि. ४ डिसेंबर २०२५ चे रात्री 12 वाजेपर्यंत खालील अधिकार प्रदान करीत आहे.
रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक कशा रितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी ? याविषयी निर्देश देणे. मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. अशा कोणत्याही मिरवणुका ज्या मार्गाने जाव्यात किंवा ज्या मार्गाने जावू नयेत ते विहीत करणे. सर्व रस्त्यावर व नदयांचे घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धुण्याचे, उतरण्याचे ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे. कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाण्याचे किंवा ढोल ताशे, शिट्ट्या व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरे बाबत नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक उपहाराच्या (अतिथी गृहाच्या) जागेत, ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकर) उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे. सक्षम अधिका-यांनी या अधिनियमांचे कलम ३३, ३६, ३७ ते ४०, ४२, ४३ व ४५ अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे. वरील आदेशाचे कोणत्याही इसमाने कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल, असे आवाहन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले आहे.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी