जि. प. व पं. स. निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या

 

जि. प. व पं. स. निवडणूकीसाठी   

निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या

अकोला, दि. 17: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबतचा आदेश जारी केला. पातूर पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. राहूल वानखडे काम पाहतील. अकोटसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी माया वानखडे काम पाहतील. मूर्तिजापूरसाठी तहसीलदार शिल्पा बोबडे या निवडणूक निर्णय अधिकारी व गटविकास अधिकारी मिलींद मोरे हे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. 

 

अकोला पं. स. क्षेत्रात उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे हे निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार गौरी धायगुडे हे सहा. नि. नि. अधिकारी असतील. बाळापूर क्षेत्रासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष येवलीकर हे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक नि. नि. अधिकारी म्हणून बंडू पजई, बार्शिटाकळीसाठी उपजिल्हाधिकारी विजय पाटील हे निवडणूक निर्णय अधिकारी व ना. तहसीलदार अतुल सोनवणे हे सहा. नि. नि. अधिकारी असतील.

 तेल्हा-यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार श्याम धनमने व सहायक नि. नि. अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी अशोक बांगर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा