शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी 14 नोव्हेंबरला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्ज शिबिर; जागेवरच कर्ज मंजुरी!

 शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी 14 नोव्हेंबरला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्ज शिबिर;

जागेवरच कर्ज मंजुरी!


        अकोला, दि. 13 (जिमाका): 'आत्मनिर्भर भारत'च्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय अकोला यांच्या वतीने  ,  दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता विशेष कर्ज शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे शेतकरी आणि गरजू वर्गाला बँकिंग सुविधा व कर्ज योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे.


       हे शिबिर अकोला परिसरात  बारोमसी हॉटेल, MIDC  परिसर, नानाजी देशमुख सभागृह, अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, बँकेच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांमध्येही हे विशेष शिबिर होणार आहे. या शिबिराचा उद्देश शेतकरी, स्वयंसहायता समूह आणि समाजातील इतर गरजू वर्गाला विविध कर्ज योजनांचा लाभ मिळवून देणे आहे.


       येथे किसान क्रेडिट कार्ड, कुक्कुटपालन, दुग्धशाळा, खाद्य प्रक्रिया, कृषी यांत्रिकीकरण आणि बचत गटांना कर्ज यांसारख्या कृषी आणि संलग्न सुविधांशी संबंधित माहिती व मार्गदर्शन मिळेल.शिबिरात नवीन कर्ज प्रकरणे त्वरित स्वीकृत केली जातील, पात्र प्रकरणांना जागेवरच मंजुरी दिली जाईल आणि त्याच दिवशी कर्ज वितरण सुद्धा करण्यात येणार आहे.


       सेंट्रल बँक ऑफ इंडियाने परिसरातील सर्व सन्माननीय शेतकरी वर्ग, कृषी उद्योजक आणि कृषी संलग्न कामांशी संबंधित व्यक्तींना या शिबिरात उपस्थित राहून त्वरित कर्ज सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा