अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान
अकोला, दि. ११ : राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या संबंधित संस्था व शाळांनी सदर शासन निर्णयानुसार परिपूर्ण प्रस्ताव दि. १४ नोव्हेंबर जिल्हा नियोजन समिती, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला या कार्यालयास मिळतील या बेताने सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. तसेच शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र नसतांना प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये, असे कळविण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा